BUY NOW

कोविड डायरी मिलिंद इंगळे

प्रश्न : तुम्हाला कोविडची नेमकी कोणती लक्षणे जाणवली आणि कधी?

उत्तर : आधी तर मला थोडा ताप आणि थोडे घशाचे इन्फेक्शन असे होते. डॉक्टरांनी तापाची व घशाची औषधे दिली. माझा ताप २ दिवसात गेला आणि ३-४ दिवसात माझें इन्फेक्शनही बरे झाले. All ok. मला वाटले झाले, हुश्श. पण कसले काय. अचानक ४-५ दिवसांनी परत बारीक ताप आला. या वेळेस मात्र डॉक्टरांनी सांगितले की तू covid टेस्ट करून घे.

प्रश्न : टेस्ट करण्यापूर्वी, दरम्यान आणि टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर काय मनस्थिती होती?

उत्तर : कधीही वाटले नव्हते की माझ्या वाढदिवशी मला covid टेस्ट करावी लागेल. दिवसभर वाढदिवसाचे फोन सुरू होते पण त्यामागे स्ट्रेस होताच. टेस्ट positive आल्यावर शॉक होताच. पण नंतर मात्र मनाचा निश्चय केला की लढायचे आहेच.

प्रश्न : पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणती ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा कसा फायदा झाला?

उत्तर :डॉक्टरांचा, BMC कडून फोन आला की तुम्ही quarantine घरी करू शकणार का? वेगळी बेडरूम व अटॅच्ड टॉयलेट असल्या कारणाने काहीच प्रॉब्लेम नव्हता. दोन दिवस ठीक होते पण नंतर अतिशय दम लागला, इतका की त्यामुळे झोपूही नाही शकलो. डॉक्टरांनी लगेच ॲडमिट व्हायला सांगितले व मी लगेच नानावटी मध्ये ॲडमिट झालो. तिथे मला hydrochloroquine व A to Z multivitamin दिलं. तिथून covid टेस्ट निगेटिव्ह आल्यावर मला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर परत मला घरीच १४ दिवस quarantine व्हायचे होते. मला वाटले सुटलो मी आता. पण परत ४-५ दिवसांनी परत मला अगदी १०१ वगैरे ताप आला. परत नानावटी. तिथे मात्र मला ताप उतरण्या करिता लावलेल्या IV औषधाचा खूपच जास्ती साईड इफेक्ट वाटले. चक्कर इतकी की उठून बाथरूम पर्यंत जाता जाता पडलोच. बेल वाजवून बोलवल्याबरोबर डॉक्टर, नर्सेस लगेच धावून आले व IV काढून मला ICU मध्ये शिफ्ट केले. तिथे कळेना की नक्की काय आहे कारण जवळ जवळ सगळ्या टेस्ट करून झाल्या होत्या; अगदी ब्रेन, हार्ट, रक्त. तिथे ही ४-५ दिवसांनी covid टेस्ट negative आल्यावर घरी सोडलं. परत १४ दिवस quarantine. तर असा हा जवळ जवळ महिनाभर चाललेला covid चा प्रवास, त्यात त्रास होता तरी साद घातली ती मात्र किशोरदांच्या शब्दांनी, रुक जाना नाही तू कही हारके…

प्रश्न : Isolation मध्ये असताना काय काळजी घेतली, घ्यायला हवी? Quarantine काळात मानसिकरीत्या स्वतःला कसे सांभाळले?

उत्तर : घरी isolation म्हणजे घरच्यांची कसरत असते. सगळे म्हणजे सगळे अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते जेवण फक्त रूमच्या दारापर्यंतच पोचवता येतात. पण माझी बायको, मानसी आणि मुलगा सुरेल यांनी हे अगदी कसोशीने पाळले. माझ्या बायकोची इव्हेंट कंपनी असल्याने तिने अगदी त्याच पद्धतीने हे सगळे manage केलं. माझ्याकरिता घरचा quarantine खूपच stress free होता. खरी परीक्षा होती ती ICU मध्ये, जिथे सभोवार पेशंट व्हेंटिलेटर वा ऑक्सिजन च्या मदतीने झुंजत होते. तुम्हाला तुमची Will power खूपच strong ठेवावी लागते.

प्रश्न : एक कलाकार म्हणून काय संदेश द्याल?

उत्तर : जेव्हा मार्च मध्ये पहिल्यांदा लॉक डाऊन झाला तेव्हा वाटलं की हे थोडक्यात आटोपेल. पण हे महिनोनमहिने चालूच राहिले. सुरुवातीला आम्ही रसिकांसाठी बरेच ऑनलाईन परफॉर्मन्स केले, जे विनामूल्य होते व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता कलाकारांची घुसमट होत आहे. एकतर लाईव्ह प्रोग्रॅम्स लवकर सुरू होण्याची काही चिन्हे नाहीत आणि त्यामुळे त्यावर विसंबून असणाऱ्या कलाकारांचा उपजीविकेचा मार्गच बंद झाला आहे. सगळ्या रसिकांना मी इथे आवाहन करू इच्छितो की या ऑनलाईन इव्हेंटसना भरभरून प्रतिसाद द्या. घरबसल्या आख्खे कुटुंब हे शोज पाहू शकते, तेही अगदी नाममात्र शुल्कात. ही या बदलत्या काळाची गरजच आहे.

MIlind

COMMENTS