BUY NOW

संपादकीय

चित्रवेधची सुरवात १९८० मध्ये जेव्हा झाली होती, तेव्हा त्यातल्या कुणालाही ही कल्पना नसेल की काही दशकांनी तंत्रज्ञान एवढी मोठी उडी घेणार आहे की जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून नुसत्या एका क्लिकने एखादं मासिक वाचता येऊ शकेल. जरी मी लिहीत बरी असले, तरी दिवाळी अंक काढायचा आणि तोही चित्रवेधचा, म्हणजे फारच मोठी जबाबदारी वाटली. पपांनी घरी त्यांची पुस्तकं ठेवायला जागा नाही म्हणून सुरु केलेलं सार्वजनिक वाचनालय केव्हा माझा अड्डा बनलं, हे कळलंच नाही. कधीही गेलं की घरी येताना पुस्तकांचे गठ्ठे घेऊन यायचं, तिथे बसताना तिथली मासिकं चाळायची. त्यामुळे संपादकाची उपाधी जरी जबाबदारीची तरीही फार मजा येणार आहे हे नक्की होतं. हे खूप आधी ठरवलं होतं की अतिशय आगळावेगळा, अभिरुचीसंपन्न असाच दिवाळी अंक करायचा. जगभरातला सिनेमा मराठी भाषेत उतरवायचा, असं एकदा ठरल्यावर मग सुरु…

Buy now for full access.