BUY NOW

सदा तेरा ही वास है

agneeahelle

‘शाळा’ तलं हे गाणं. या गाण्यामागचे गुणी कलाकार म्हणजे अग्नी आणि शैली. अग्नीला खरं तर ओळखीची गरज नाही. यांचा शो म्हणजे दोन तीन तास एका धुंदीत नेणारा! आणि शो संपल्यावर, अरे संपला एवढ्यात, असे वाटायला लावणारा. हा बॅण्ड आहे प्रचंड लोकप्रिय, सोशल मीडिया वर लाखो चाहते आणि देशातल्या रॉक बॅंड्स मध्ये अतिशय लाडका असा. तरुणाईला वेड लावणाऱ्या चाली, शोज मधे सळसळता परफॉर्मन्स आणि या सगळ्यामध्ये न विसरलेली भारतीय सांगीतिक मूल्यं; हा आहे अग्नीच्या यशाचा मंत्र.

रॉक संगीत पण असे की ज्याच्या वर प्रभाव आहे कबीर, वैदिक आणि कर्नाटक संगीताचा. खूप सारे अवॉर्ड्स आणि रसिकाश्रय असे दोन्ही लाभलेले, अधून मधून रसिकांना मेजवानी ठरलेले चित्रपट संगीत करणारे, असे हे मस्त अग्नी. शाळा, आलाप,दिल दोस्ती etc, ये है बकरापुर, या चित्रपटांमधून संगीत दिलेले हे रॉकर्स. अग्नी हा रॉकबँड आहे कोको उर्फ कौस्तुभ ढवळे, मोहन, ऋषिकेश दातार आणि चिरायू वेडेकर यांचा. कोको हा या बँडचा मुख्य गिटारिस्ट आहे तर मोहन आहे बँडचा मुख्य गायक. दोघंही आपापल्या परीनं वेगळे आहेत. कोको वर आहे क्लासिक रॉक, ब्लूज आणि भारतीय संगीताचा प्रभाव तर मोहन आहे कर्नाटक संगीत शिकलेला आणि मृदंग वाजवणारा.

स्वतःच्याच जगात रमणारा आणि शब्दांमधून स्वप्ने चितारणारा गीतकार शैली उर्फ शैलेंद्र सिंह सोढी. आजच्या जगात प्रसिद्धीच्या मागे धावणारे बरेच दिसतात. प्रसिद्धी पराङमुख आणि झगमगत्या मोहनगरी पासून लांब राहणारा हा मस्त कलंदर. उडता पंजाब, देव डी, लव्ह शव ते चिकन खुराना, जुगनी अशा अनेक चित्रपटांमधील गीतकार. ‘चिट्टा वे’, ‘परदेसी’ अशी रेकॉर्ड ब्रेक गाणी लिहिणारा, तो ‘डुग डुगी डुग’असे एखादे गाणे लिहून जातो, तोच परत ए. आर. रहमान करिता उफाळते असे ‘जुगनी’ हे ही लिहितो. एम टीव्ही वर कोक स्टुडिओ ‘चौधरी’ या गीताने दुमदुमून सोडणारा हा प्रतिभावान गीतकार. शैली आहे आपल्या मातीशी घट्ट नाते असलेला पण तरीही नवे आकाश शोधणारा कवी. अनंथाल, अग्नी अशा रॉक बँड्स करिता असू दे किंवा अगदी छोट्या पण परिणामकारक जाहिराती, शैली सगळ्यावरच आपली अशी एक छाप उमटवतो.

agneeahelle-4

COMMENTS