BUY NOW

सूर नवे मीता वसिष्ठ

mittha_1

पूनम बिश्त

ऐसे ही किरदार मिलते हैती ‘कहानी घर घर की’ मधली तृष्णा आहे, ती ‘गुलाम’ मधली फातिमा आहे, वयाच्या २५व्या वर्षी आर्ट सिनेमाचे दिगज्ज मणी कौल, गोविंद निहलानी, मणी रत्नम, यश चोप्रा यांच्याशी हुज्जत घालणारी हुशार अभिनेत्री आहे. न पटणाऱ्या गोष्टींवर कुठलेच आढेवेढे न घेता बिनधास्त बोलणारी आणि तुझी आवडती अभिनेत्री कोण असं विचारलं तर चटकन ‘मीता वसिष्ठ’ म्हणणारी ही अवलिया! मीता वसिष्ठ हे नाव ऐकल्यावर लोक जरा दबकूनच वागतात. कारण भलतंसलतं ती खपवून घेत नाही, चुकीच्या मुद्द्यांवर लोकांचा कधी पाणउतारा करेल सांगता येत नाही. असे बरेच समज गैरसमज तिच्या बाबतीत आहेत. पण मीता मागचा राग, द्वेष विसरून आपण प्रत्येक माणसाला दरवेळी भेटताना नव्याने भेटावे, हे तत्त्व मानते. तिच्या टुमदार घरात सकाळच्या चहावर ती मनमोकळेपणाने भेटली.

‘सिरीयस अॅक्ट्रेस’ म्हणून लागलेला टॅग या पलीकडची मीता ‘चित्रवेध’ ने टिपली आहे. व्हिलन म्हणून ती जितकी कणखर दिसते, त्यापेक्षा माणूस म्हणून तिच्या व्यक्तिमत्त्वाचे बरेच पदर आहेत. ‘क्योंकि ऐसे ही किरदार मिलते हैं’

इसकी नाक थोडी लंबी है गुलजार यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘किरदार’ मालिकेत ‘आलम’ नावाची व्यक्तिरेखा मीताने साकारली. त्यात तिला उद्देशून एक पात्र म्हणतं, ‘तुला साजेसा कोणी कसा भेटेल गं, कारण तुझं नाक म्हणजेच स्वाभिमान इतका आहे की त्याच्यासमोर कोणी टिकत नाही.’ हे मीताच्या आयुष्याबाबतीतही खरं ठरतं, लोक म्हणतात या वयात लग्नाशिवाय, मुलांशिवाय कसं राहू शकते. पण लोकांच्या फुटकळ विचारांना महत्व देणारी मीता नाहीये. स्पष्टपणे बोलून मोकळी होते. लोकांना वाटत असेल या वयात मला सेक्सची गरज आहे, पण स्वतःचा पार्टनर निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण ते नातं क्षणिक नसतं. एका व्यक्तीच्या संपर्कात राहून तुम्ही एका उर्जेची देवाणघेवाण करता आणि कोणाकडून तुम्ही काय घेता यावर सेन्सॉर लागणं जास्त महत्वाचं आहे. आहे बंडखोर तरी आयुष्यात मी बऱ्याच स्तरांवर बंडखोरी दाखवली. माझे बाबा आर्मीत होते. मी आयएएस व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. पण, कॉलेजमध्ये असताना मी मला अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे, हे ठरवलं. त्याचा विरोध झाला, पण मी एनएसडीला (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) प्रवेश मिळवला.अभिनयाचं रीतसर शिक्षण घेऊन मी बाहेर पडले.

मुंबई गाठली आणि सिनेमात काम करायला लागले. अभिनय चांगला करते, पण आपल्याकडे हिरॉइन फक्त गोऱ्या गोमट्या मुलीच चालतात. तुला टॉपवर पोहचविण्यासाठी उत्तम मार्केटिंग आणि पीआर करू. पण, त्या बदल्यात आम्हाला पण काहीतरी हवं, असं म्हणणारी लोकं भेटली. त्यांना फाट्यावर मारून सगळ्या परिस्थितीला सामोरे गेले. योग्य ठिकाणी नाही म्हटलं, लोकांना ही बंडखोरी वाटत असली तरी तो माझा मूळ स्वभाव आहे. यावर्षी आईसोबत दिवाळी साजरी करणार. लहानपणी भावंडं, नातेवाईक आणि शेजारी यांना एकत्रित करून साजरी केली जायची. पण आता सगळे आपापल्या मार्गाला लागले, त्यामुळे दिवाळीतला वेळ स्वतःला देते. आमच्याकडे आजी बेसनाचे लाडू, गुजीया (करंजी) छान बनवायची. घरी बनवलेले पदार्थ खाण्याची मज्जा काही औरच आहे. यंदा दिवाळी दिल्लीला आईसोबत साजरी करणार. तिला हलवा आवडतो. यंदा खाण्याचे बेत आखणे आणि बनविणे या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यावर असतील.

टीव्ही फक्त पैशासाठी .. टीव्हीचा सुवर्ण काळ मी प्रेक्षक म्हणून पाहिला आणि कलाकार म्हणून अनुभवलेला आहे. नव्वदीच्या काळातल्या मालिका आणि आताच्या यांत जमीन अस्मानचा फरक आहे. आताचा टीव्ही खरंच इडियट बॉक्स आहे. बऱ्याचदा टीव्हीसाठी काम करताना त्रास होतो, पण काय करणार; पैशासाठी करावं लागतं. आपल्याकडे महिलांसाठी सिनेमा लिहिला जातं नाही. आपल्याकडे लोकांना कमी वयाच्या हिरॉइन्स बघायच्या असतात, पस्तीशी चाळीशी नंतर त्यांना आईचा रोल दिला जातो. माझ्या मते प्रत्येक चाळीशीतली बाई आदर्श आई नसते, तिची काही स्वप्नं असतील, तिला काही तरी करायचं असेल. पुन्हा प्रेमात पडायचं असेल. अशा काही कहाण्या लोकांसमोर यायला हव्यात. उगीच स्त्री सक्षमीकरण किंवा पुरुषप्रधान संस्कृतीला आम्ही नष्ट करू याचे नारे लावणारे सिनेमे नकोत. आजच्या अभिनेत्री एका उंचीवर जाऊन निर्मात्या होतात किंवा त्यांना टिकून राहण्यासाठी एखाद्या श्रीमंत निर्मात्याशी लग्न करावं लागतं. पण मला स्वतःहून स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. लवकरच नवी संहिता घेऊन येतेय.

माझ्यात बऱ्याच गोष्टींचा राग धुमसत असतो. त्याला क्रीएटिव्ह वाट मिळवून देण्याची धडपड करतेय. कारण एक अभिनेत्री म्हणून माझी घुसमट होत आलीय. ‘ताल’च्या एका सीनमध्ये मी ऐश्वर्या रायपेक्षा जास्त उठून दिसत होते, असं सुभाष घई म्हणाले होते. सगळं लक्ष माझ्याकडे वेधलं जात होतं. तेव्हा त्यांनी मला आणि ऐश्वर्याला एका सीनमध्ये जास्त वेळ ठेवलं नाही. असं माझ्यासोबत बऱ्याचदा घडलय. मी अभिनेत्री म्हणून हुशार आहे, हा विचार बऱ्याच लोकांना आगाऊपणाचा वाटत असला तरी हे सत्य आहे. अभिनयाची जाण ही मला देवाकडून मिळालेली देणगी आहे. या गोष्टीचा मला अभिमान नाही पण त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

mitha_2

लोक संगीत आणि अभिनयाचं वर्कशॉप मागची काही वर्षं मी संगीताशी जोडले गेले आहे, लोकसंगीतासाठी माझा शोध नेहमीच सुरु असतो. तसंच अभिनयाचं प्रशिक्षण देते. वेगवेगळ्या टप्प्यातून मुलांना अभिनय आणि त्याचं तंत्र काय असते याचं वर्कशॉप घेते. तीन आठवडे असतं. एकावेळी फक्त आठ जण कंपूत असतात. जेणेकरून प्रत्येकाच्या कलेवर काम करता येतं.

मराठीशी माझं नातं आहे मला मराठी उत्तम बोलायला शिकायचं आहे, काही वर्षांपूर्वी नीना कुलकर्णीसोबत ‘शेवरी’ आणि सुमित्रा भावेचा ‘जिंदगी जिंदाबाद’ हे दोन मराठी चित्रपट केले होते. मुंबई फक्त मराठी माणसांचीच असं म्हणणाऱ्यांची खरंच कीव येते. माझे कुटुंब पणजी- पणजोबापासून मुंबईत वाढलं आहे. माझ्या आईचे आजोबा राम मेहता हे ‘लीडर’ नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक होते. संपादकीय मुद्द्य्यांवर चर्चा करायला गांधीजी बऱ्याचदा आमच्या घरी येऊन जायचे. राजकारण, समाजकारण याचं बीज घरातून आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर मी आपली रोखठोक बाजू मांडू शकते.

आयुष्याच्या कठीण टप्प्यावर सध्या मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मला माझं काम सोडून इतर गोष्टींकडे पण पाहावं लागतंय. आई बाबांचं वय झालं आहे. लग्न झालं नसलं तरी कुटुंबात आई-बाबा आहेत, त्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे. आधी त्यांना तीन महिन्यांतून एकदा फोन करायचे, आता दिवसातून तीन वेळा करते. घटना आणि परिस्थिती माणसाला बदलतात. मला अभिनेत्री म्हणून अजून एक वेगळा टप्पा गाठायचा आहे. येत्या काही वर्षात खूप चांगल्या व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला याव्यात हीच माझी विश लिस्ट आहे.

COMMENTS