BUY NOW

UCC

उर्वझी इराणी हिचा कोणताही सिनेमा विचार करायला लावतो. या माध्यमातून तिने विचारलेले प्रश्न आपल्याला पडू लागतात आणि आपणही ती उत्तर शोधायला लागतो.
त्यात तिचा सिनेमा दिसायला देखणा असतो त्यामुळेही तो आठवत राहतो. Anahita’s law हा तिने दिग्दर्शित केलेला सिनेमा हल्लीच येऊन गेला. तीन वेगवेगळ्या स्त्रिया आणि आणि कायद्यातील तरतुदी / त्रुटी यामुळे त्यांच्या जीवनावर झालेले परिणाम या सिनेमात दिसतात आणि हे ही लक्षात येतं ही सर्वाना समान कायदा असता तर त्या स्त्रियांची अशी परवड कदाचित झाली नसती आणि म्हणूनच युनिफॉर्म सिविल कोडची किती गरज आहे हे जाणवते.
या सिनेमात जरी पारशी स्त्री दाखवली असली आणि ucc नसल्याने तिच्यावर झालेले आघात दाखवले गेलेले असले तरी ते सगळ्यांनाच कसे लागू पडेल यावर चर्चा झाली.
UCC काय आहे हे सर्वांपर्यंत पोचावे हा ही तिच्या या सिनेमाचा एक हेतू होता आणि तोच धागा घेऊन चित्रवेधने त्यावर अजून प्रकाश टाकण्यासाठी या सिनेमाच्या दिग्दर्शिका उर्वझी, कायदेतज्ञ प्रशांत ठोंबरे आणि एक प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या सुवर्णरेहा जाधव यांच्याबरोबर हे एक अनौपचारिक चर्चासत्र आयोजित केलं होतं.

COMMENTS