चार्ल्स थॉमसन कोण कुठला चार्ल्स थॉमसन; ऑस्ट्रेलियाहून भारतात येतो काय, आणि इथेच रमतो काय. कोणती साद ऐकून तो इथे आला ह्या प्रश्नाचं काहीच उत्तर नाही त्याच्याकडे. तो बिहार मध्ये अकरा वर्षं राहिला. त्यामुळेच की काय, अस्खलित हिंदी बोलू लागला. सळसळता उत्साह आणि सतत काहीतरी नवीन करत राहण्याची धडपड त्याच्या कामात दिसतात. त्याचा फिल्मी प्रवास सुरु झाला तो मराठी सिनेमा आणि टी व्ही मधून. आता तो झी न्यूज करिता हिंदी मधून शोज करतो. अलीकडेच त्याने दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीवर आधारीत असलेला एक हिंदी कार्यक्रम सागर केला. हा कार्यक्रम ‘ऑटोवाले बाबू’ फारच लोकप्रिय झाला. चार्ल्सला भारतातच राहून काम करायचंय. त्याला हल्लीचे काही स्त्रीप्रधान चित्रपट फार भावले. त्याच्याच शब्दांत त्याचं मनोगत. महिलांवर काढलेले हे चित्रपट मला भारतातील चित्रपट महोत्सवात बघायला मिळाले हे मी…
Register now for full access.
COMMENTS