चित्रवेध | पैठणी
PlayPlay
चित्रवेध | कवितालेखन स्पर्धा २०१८ । १ । ऋतुजा बागवे । जाणीव ।
PlayPlay
चित्रवेध | मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं
PlayPlay
चित्रवेध | कवितालेखन स्पर्धा २०१८ । २ ।ऋतुजा बागवे । किती किती ।
PlayPlay
Chitravedh 2019 Trailer
PlayPlay
Chitravedh Anahad Diwali Wishes
PlayPlay
Ronkini Gupta Diwali Wishes
PlayPlay
दिवाळी शुभेच्छा - Mrinal Kulkarni
PlayPlay
चित्रवेध - झलक ( Trailer ) !!!!
PlayPlay
चित्रवेध - लवकरच येत आहे..!!!
PlayPlay

previous arrow
next arrow

cover-photo 2024

इरॉस!

मुंबईच्या गजबजलेल्या चर्चगेट सारख्या भागात आजही दिमाखानं उभं असलेलं इरॉस! एकेकाळी अतिशय आलिशान, जागतिक पातळीवरही उठून दिसेल असं व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको स्टाईलने उभं केलेलं इरॉस थिएटर केवळ मुंबईची शान नाही, तर आज वर्ल्ड हेरीटेज साईट्स मध्ये समाविष्ट झालेलं आहे. पारशी समाजाने दिलेल्या काही उत्तम गोष्टींपैकी एक असं या थिएटरबाबत म्हणता येऊ शकेल. १९३८ साली पारशी व्यावसायिक खंबाटा यांनी खूप विचारपूर्वक आणि आलिशान अनुभव देईल असं हे थिएटर उभं केलं आणि मुंबईच्या शोभास्थळांमध्ये भर पडली. मार्बल, शिसवी जिने, सोडा वॉटर फाउंटन, व आर्कीटेक्चरल सौंदर्याने नटलेलं हे थिएटर केवळ सिंगल स्क्रीन करता प्रसिद्ध नव्हतं. इथे सिनेमा बघायला येणं, मध्यंतरात इथल्या सुंदर फॉयर मध्ये गप्पा मारणं, इथल्या छोट्या मंचावर जागतिक कीर्तीचे संगीत वाद्यवृंद कला सादर करताना ऐकणं हा मुंबईकरांसाठी लक्षणीय अनुभव असे. कालांतराने, इतर अनेक अशाच भव्य दिव्य वास्तूंप्रमाणे इरॉसलादेखील देखरेखीच्या समस्या, पैशांची कमतरता, अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण, अनेकांनी ही वास्तू जपली जाण्यासाठी अनंत प्रयत्न केले. आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर या सुंदर वास्तूचं नूतनीकरण होऊन आयमेक्स स्क्रीन सुरु झाला.

आमच्या अंकासाठी या आयकॉनिक थिएटरचे सुंदर मिक्समीडिया वापरून हे चित्र रेखाटलं आहे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध चित्रकार
प्रफुल्ल हुडेकर यांनी!

We are currently working on article category section. Stay tuned!