BUY NOW

Sponsor Info

संजीवनी व सुजय पाटील यांचे २५ वर्षाहून अधिक काळ दुबई मध्ये वास्तव्य आहे. येथे नोकरी निमित्ताने कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्र मंडळ दुबईचे प्रतिनिधीत्व केले. विश्वसाहित्य संमेलनात नामवंत जागतिक उद्योगजकांशी संपर्क आला. ह्या चेतनेनेच प्रेरित होऊन मराठी आणि इतर भारतीयांच्या सेवेसाठी उद्योगातून काही करावे या निर्मळ हेतूने ओम पी के ट्रेडिंग, दुबई ह्याची निर्मिती झाली. अन्न हे पूर्णब्रम्ह! संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रकारचे मसाले , पापड , दिवाळी फराळ , सर्व प्रकारची उत्तम पीठे; हे यांचे वैशिष्टय आहे. पणशीकर , चितळे !, कुबल , केप्र , सोहम , सकस, टेस्ट ऑफ लाइफ, खातू मसाले , राज मसाले , गौरी आजी किचन, शैला आजी किचन, असे उत्तम ब्रँड व पदार्थ सर्व आखाती देशात उपलब्ध करून दिले. उत्तम चव , उत्तम सेवा, उत्तम रिलेशनशिप हीच ओम पी के ट्रेडिंग ची खासीयत म्हणावी लागेल. दुबई, शारजाह , अजमान ,रसलखैमाह अबुधाबी , अलाइन , मस्कट , बहारिन अणि कॅनडा, अमेरीका येथेही ओम पी के ट्रेडिंग चे प्रॉडक्ट्स आहेत. उद्योग आणि सामाजिक कार्य याचा समन्वय ओम पी के ट्रेडिंग मध्ये साधला जातोय.

वृध्द, गरजू स्त्रिया, दिव्यांग, एनजीओ, समाजातील ही जबाबदारी उचलण्याचे कार्यही उद्योगातून केले जाते. गणपती, दसरा, दिवाळी आणि इतर सर्व सण आखाती देशात आणि सर्व जगात साजरे करण्यास हातभार लावावयास ओम पी के ट्रेडिंग तत्पर असते. सगळे मराठी पदार्थ व मसाले अगदी एका क्लिकने ऑर्डर करता येतील अशी सोय ओम पी के ने त्यांच्या वेबसाइट द्वारे करून दिली आहे.
यामागचे कष्टाळू आणि लोकप्रिय जोडपे म्हणजे सुजय व संजीवनी पाटील. दुबईमधे सांस्कृतिक जीवनावर एक अविभाज्य ठसा उमटवणारे हे दोघंही मराठी भाषेच्या प्रेमाखातर बऱ्याच उपक्रमांमध्ये आघाडीवर असतात; मग ते ग्रंथ तुमच्या दारी सारखा उपक्रम सगळ्या एमिरातीं मध्ये राबवणे असो वा मराठी शाळा असो. सगळीकडे लगबगीने वावरणाऱ्या संजीवनी पाटील यांनी xyz पण सुरू केले.

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करावे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी स्वउद्योगिनी नावाची संस्था स्थापन केली आहे. ज्यायोगे स्वउद्योगीनींना उद्योगीनी बनवायचे सामाजिक कार्य दुबईत संजीवनीच्या नेतृत्वाने घडते.

मराठी संस्कृती जपावी आणि पुढील पिढीलाही मराठी भाषा समजावी, उमजावी, लिहिता, वाचता यावे यासाठी इंडियन कॉन्सुलेट दुबई येथे मराठी शाळा चालविण्याचे उत्तम कार्य संजीवनी पाटील यांच्या प्रतिनिधित्वाने साकारले जाते

सत्यनारायण पूजा, गणेश स्थापना, लग्न, मुंज, यासारखे अनेक विधी साहित्य आणि गुरुजीसहित सेवा ओम पीके तर्फे दिली जाते

शाडूच्या गजानन मूर्ती दुबईत फक्त ओम पीके मधेच उपलबध आहेत. अशा अनेक सहज उपलब्ध नसणाऱ्या व नाविन्य असणाऱ्या वस्तु शोधणे हीच पाटील कुटुंबीयांची खासियत आहे.