ऑटोवाले बाबू

john

कोण कुठला चार्ल्स थॉमसन; ऑस्ट्रेलियाहून भारतात येतो काय, आणि इथेच रमतो काय. कोणती साद ऐकून तो इथे आला, ह्या प्रश्नाचं काहीच उत्तर नाही त्याच्याकडे. तो बिहार मध्ये अकरा वर्षं राहिला. त्यामुळेच की काय, अस्खलित हिंदी बोलू लागला. सळसळता उत्साह आणि सतत काहीतरी नवीन करत राहण्याची धडपड त्याच्या कामात दिसते. त्याचा फिल्मी प्रवास सुरु झाला तो मराठी सिनेमा आणि टी व्ही मधून. आता तो झी न्यूज करिता हिंदी मधून शोज करतो. अलीकडेच त्याने दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीवर आधारीत असलेला एक हिंदी कार्यक्रम सादर केला. ‘ऑटोवाले बाबू’ हा कार्यक्रम फारच लोकप्रिय झाला. चार्ल्सला भारतातच राहून काम करायचंय.

त्याला हल्लीचे काही स्त्रीप्रधान चित्रपट फार भावले. त्याच्याच शब्दांत त्याचं मनोगत. महिलांवर काढलेले हे चित्रपट मला भारतातील चित्रपट महोत्सवात बघायला मिळाले हे मी माझं भाग्यच समजतो.

१. ‘एक अलबेला’ हा चित्रपट स्व. भगवान दादांच्या चरित्रावर आधारलेला आहे. प्रमुख भूमिका माझ्या अत्यंत आवडीची अभिनेत्री विद्या बालन हिने केली आहे.

२. दुसरा चित्रपट म्हणजे ‘पार्चड्’ हा चित्रपट एका वेगळ्याच वाटेने जाणारा आहे. ह्यातील तिन्ही प्रमुख भूमिका स्त्री कलाकारांनी अतिशय सुंदर रीतीने साकारल्याआहेत.

३. ‘पिंक’- ह्या चित्रपटाचा नायक जरी अमिताभ बच्चन असला तरी चित्रपटाची कथा अविवाहित मुली आणि त्यांना समाजात मिळणारी वागणूक यावर आधारलेला आहे. हा सुंदर चित्रपट भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत असलेल्या दुट्टप्पी वागणुकीवर प्रकाश टाकतो.

COMMENTS