पहिली बंगाली स्त्री – गुप्तहेर

- स्वाती दाढे

गुप्तहेरांच्या कथा, डिटेक्टिव्ह कथा कोणाला आवडत नाहीत? त्यातील रहस्य, गुप्तहेरांचं बुद्धी-कौशल्य, शेवटच्या क्षणीचा थरार… हे सारं कमालीचं गुंगवून ठेवणारं असतं. सामान्य बुद्धीला, आपल्या पंचेंद्रियांना न जाणवणारे आजूबाजूचे सूक्ष्म बदल, घटना, आचरण, विचित्रपणा या गुप्तहेरांना सहज दिसतात, जाणवतात, उमगतात आणि त्या आधारे ते रहस्याचा ज्याप्रकारे उलगडा करतात ते सारं वाचताना, सिनेमात बघताना आपण रोमांचित होतो.मराठीतील धनंजय, गोट्या, फास्टर फेणे, समर्थ, बंगालीतील व्योमकेश बक्षी या गुप्तहेरांच्या रहस्य-कथा आपल्याला खिळवून ठेवतात, थरारक अनुभूती देतात. इंग्रजीतील शेरलॉक होम्स, जेम्स बॉंड, अगाथा ख्रिस्तीच्या कथा इत्यादी रहस्यकथा जगभर प्रसिद्ध आहेत,लोकप्रिय आहेत.त्यांचे नावीन्य, आकर्षण कधीच कमी होणार नाही. परंतु, एक प्रश्न मनात अधूनमधून डोकावतो. हे गुप्तहेर, सगळे पुरुषच का?कसे? अगाथा ख्रिस्तीच्या मिस मार्पेलच्या, मराठीतील रजनीच्या काही कथा सोडल्या, तर सर्व लेखकांनी पुरुषांनाच रहस्यकथांचे गुप्तहेर म्हणून का निवडले?…

Register now for full access.