साधारण ५४-५५ वर्षांपूर्वी म्हणजे नक्की सांगायचं झालं तर दि. २३ डिसेंबर १९७० रोजी, मुंबईतल्या-चौपाटीजवळच्या मरिन लाईन्स इथल्या बिर्ला मातोश्री सभागृहात ‘नटसम्राट’ या विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी लिहिलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ते नाटक थाटामाटात रंगभूमीवर आणलं ‘धी गोवा हिन्दू असोसिएशनस कलाविभाग’ या संस्थेनं… ‘नटसम्राट’ हे अजरामर नाटक म्हणजे मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचा ‘मैलाचा दगड’- थोर नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या काही कलाकृतींवरून प्रेरित होऊन लिहिलेलं हे नाटक म्हणजे कौटुंबिक-जिव्हाळ्याचं -कारुण्यरसानं ओथंबलेलं ‘गणपतराव तथा आप्पासाहेब बेलवलकर’ या वृद्ध कलाकाराची शोकांतिका सांगणारं काव्यमय नाटक होय. नटसम्राटचं दिग्दर्शन ख्यातनाम लेखक-दिग्दर्शक-आकाशवाणीचे निर्माते ‘पुरुषोत्तम दारव्हेकर’ यांनी केलं होतं, तर डॉ. श्रीराम लागू (आप्पासाहेब), शांता जोग (कावेरी), भाऊ बिवलकर (विठोबा) यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. मराठीतील हे एकमेकाद्वितीय असं नाटक आहे जे इतकी दशकं ओलांडली तरी नाट्यप्रेमींच्या…
Register now for full access.