विक्रम गोखले म्हणजे अभिनयाचं विद्यापीठच. त्यांचं ‘बॅरिस्टर’ नाटक म्हणजे कित्येक नटांकरिता एक रेफरन्स बुक होतं. त्यांची नव्या पिढीला काहीतरी द्यायची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच की काय ते बऱ्याच महाविद्यालयांमध्ये शिकवतात. त्यांची अभिनयाची शाळा ही आपल्या सगळ्यांनाच काहीतरी शिकवून जाईल हे नक्की. आजकालच्या सिरीयल मधलं मराठी ऐकून बिघडलेले कान विक्रम गोखल्यांचे मराठी ऐकून सुधारतील, इतकं सुंदर मराठी आहे त्यांचं. त्यांनी अभिनयाच्या सोप्या बनवलेल्या पायवाटा, त्यावरून चालताना हमखास पडणारे प्रश्न आणि आपली ठरलेली मिथकं; या सगळ्यांचा खुलासा अतिशय अभ्यासपूर्ण शैलीने मांडत ही शाळा भरते. एवढं पुरेसं नाही म्हणून की काय, ते एका हुषार विद्यार्थ्याला बोलावून एक प्रात्यक्षिकही देतात.
Register now for full access.
COMMENTS