सामाजिक परिवर्तनाचे उत्प्रेरक असलेले चित्रपट

- प्रिया प्रभुदेसाई

चित्रपट हे केवळ कथाकथन किंवा मनोरंजनाचे माध्यम नाही. हे श्राव्य आणि दृश्य माध्यम आहे. त्यामुळे समाजमनावर होणारा त्याचा परिणाम तात्काळ आहे. अल्पावधीत मोठ्या समूहाला प्रभावित करणे, एखाद्या अनिष्ट गोष्टींबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण करणे, योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देणे, समाजाची जागरूकता वाढवून त्याला सक्रिय करणे ही चित्रपटाची क्षमता असल्याने, योग्य तो बदल घडवण्यासाठी चित्रपट हे निश्चितच अत्यंत शक्तिशाली माध्यम आहे. सर्वसामान्य माणसांना अज्ञात असलेले वास्तव, चित्रपट समोर आणतात. सामाजिक अन्याय, पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी हक्काचे उल्लंघन, चुकीच्या परंपरा, त्यामुळे रुजलेली चुकीची मते अशा अनेक मुद्यांवर सत्य आणि कल्पिताची योग्य ती सांगड घालून, लोकांना समजतील आणि भावतील असे चित्रपट बनवल्याने, हे महत्वाचे मुद्दे लोकांपर्यंत पोचतात. त्यावर चर्चा होते, समाजमन ढवळून निघते आणि अनेक वेळा बदल घडण्याची सुरुवात होते. खऱ्या अर्थाने…

Register now for full access.