सिनेमा ते सिनेमा

श्यामची आई (१९५३) लेखक/दिग्दर्शक:- प्र. के. अत्रे मूळ कथा:- साने गुरुजी संगीत:- वसंत देसाई कलाकार:- वनमाला पवार, माधव वझे सिनेमा हे एक मनोरंजनाचं माध्यम आहे. पण काही सिनेमे हे नुसतं मनोरंजन न करता मैलाचा दगड बनून राहतात. हे सिनेमे त्याच्या विशिष्ट कथेमुळे, सादरीकरणामुळे वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहतात. अशाप्रकारचे सिनेमे पुढे पायंडा घालण्याचं काम करतात. मराठीतील अशाच काही मोजक्या लक्षवेधी सिनेमांचा घेतलेला हा आढावा. राष्ट्रीय पुरस्कारांत सुवर्ण कमळ मिळवलेला हा पहिला मराठी चित्रपट. कोवळ्या वयात असणाऱ्या श्यामवर त्याच्या आईने केलेले संस्कार आणि त्या संस्कारांचा, त्या मूल्यांचा त्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम याचं दर्शन परिणामकारक पद्धतीने या सिनेमात केलं आहे. आईच्या शिकवणीनुसार आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींशी सामना करताना श्यामची होणारी कसरत यातून दिसते. हा चित्रपट ‘श्यामची आई’ या सानेगुरुजींच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित आहे. ह्या…

Register now for full access.

COMMENTS