स्वगत

रश्मी देव

कार्यशाळा नाट्यलेखन – तंत्र करोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेली नाट्यलेखन – तंत्र ही योगेश सोमण सरांची ६ रविवार असलेली कार्यशाळा. एकीकडे बाहेर रोज करोनाचे वाढते आकडे, अनिश्चितता, नैराश्य आणि दुसरीकडे दर रविवारी आम्हाला मिळणारे वेगवेगळे लेखन अभ्यास. अख्खा आठवडा दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी आमच्यातील संवेदना, सर्जनशीलता, कल्पकता यांना जागं करून त्यांचा कस लावण्यात जायचा. नंतर-नंतर आम्ही लिहिलेलं लिखाण वाचायला केवळ रविवारी नाही तर रोज भेटू लागलो (अर्थात ऑनलाइन) आणि मग ते ६-८ आठवडे वेगवेगळे विषय, त्यावरचे लिखाण करणे किंवा ऐकणे एवढंच एक व्यवधान उरलं. हे व्यवधान तेव्हा अगदीच गरजेचं होतं कारण, कोणाचं काम थांबलेलं, कोणाच्या घरी कोणी आजारी होतं, कोणाचा जॉब गेलेला होता तर कोणी भविष्याच्या चिंतेत होतं. पण या सगळ्यातही रोज काही तरी लिहायचं आहे आणि सगळ्यांना…

Register now for full access.

COMMENTS