लगानच्या अभूतपूर्व यशानंतर आशुतोष गोवारीकरचा पुढचा सिनेमा कोणता असेल याची उत्सुकता असताना, तो ‘स्वदेस’ घेऊन दाखल होतोय हे कळले. खरे तर तीनेक वर्षे होऊनसुद्धा लगानची आठवण अजूनही ताजी होतीच. आशुतोष गोवारीकर, जावेद अख्तर आणि ए. आर. रहमान हे त्रिकुट आपली जादू पुन्हा एकदा पडद्यावर साकारणार याचा आनंद एकीकडे आणि यावेळी सोबतीला शाहरुख असणार याची उत्सुकता दुसरीकडे. सिनेमा आला, रिलीज झाला आणि बहुतांश प्रेक्षकांनी मात्र त्याला नाकारले. २००३ -२००४ मध्ये, स्वदेसच्या आधी ‘कल हो ना हो’, ‘चलते चलते’, ‘मैं हूँ ना’, ‘वीर झारा’, इथे शाहरुख रोमँटिक हिरो म्हणून त्याच्या करियरच्या सर्वोच्च शिखरावर होता. शिवाय हे सर्व मसाला सिनेमे प्रेक्षकांची नस ओळखून तयार केलेल्या प्रुव्हन फॉर्म्युलयावर आधारित असल्याने ते ब्लॉकबस्टर होते. या कोशातून बाहेर येऊन शाहरुख एक अशा नासाच्या सायंटिस्टची गोष्ट घेऊन…
Register now for full access.