कुठल्याही क्षेत्रात आपण एखाद्या विशिष्ट काळाचा उल्लेख ‘सोनेरी काळ किंवा सुवर्णयुग’ म्हणून तेव्हा करतो जेव्हा त्या काळात त्या क्षेत्रामध्ये ‘न भूतो न भविष्यती’ अशी उत्तुंग कामगिरी झालेली असते. त्या क्षेत्रात अनेकार्थानं वैभवाचं उत्तुंग शिखर गाठलं गेलेलं असतं. त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे देदीप्यमान आविष्कार जगासमोर आलेले असतात; आणि अशा त्या काळात जन्मलेल्या कलाकृती पुढे अनेक दशकं, शतकं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. त्याच न्यायानं साधारपणे १९२७ नंतर बहुतेक देशांमधनं फोफावलेलं सिनेमांचं वेड बघितलं तर – ‘उत्तम कथा- पटकथा, अफलातून तंत्रज्ञान, अद्वितीय कलाकार, मोहवणारं संगीत, अचाट फोटोग्राफी आणि एकाहून एक अद्भुत टॅलेन्टेड दिग्दर्शक’- अशा निकषांवर हॉलिवूडची १९३० ते १९६० मधली तीस वर्षं निर्विवादपणे बाकी संपूर्ण जगाला मागे टाकतील अशी अफाट अचाट कामगिरी तिथे होऊन गेली आणि त्याचं गारुड जगभरच्या हॉलीवूडवेड्या दर्शकांइतकंच माझ्याही…
Register now for full access.