इजिप्त मधील सिनेमासृष्टीचा उदय हा सुमारे १९२० सालातला गणला जातो आणि योगायोगाने त्याच वेळी स्त्रीमुक्ती किंवा स्त्रीवादी चळवळही सुरु झाली. त्यात प्रामुख्याने मध्यमवर्गीय स्त्रिया आणि पुरुषांचा पुढाकार होता. बघता बघता ही चळवळ फोफावली आणि सर्वदूर पसरली. ह्या मोठ्या चळवळीचे उद्देश्य होते स्त्रियांना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने जागा मिळवून देणे. अझिझा अमीर, इजिप्तस्थित स्त्री दिग्दर्शक आणि निर्माती सर्वप्रथम पडद्यावर आली ती इजिप्तच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून, १९२७ साली. याचित्रपटाचे नाव होते Leila. स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाने आणि सबलीकरणाने मात करू शकतात. काळानुसार मात्र स्त्रियांची खालावलेली प्रतिमा पडद्यावर बघायला मिळते. एकीकडे अगदी आक्रमक प्रतिमा उदा. व्यक्त होणारी, आपल्या हक्कांची जाणीव असणारी आणि त्यासाठी लढणारी, बिनधास्त, धाडशी आणि म्हणूनच पुरुषांच्या दृष्टीने अवास्तव महत्वाकांक्षी, तर दुसरीकडेअतिशय गरीब आणि साधी, अननुभवी, बावळट, मानसिक…
Register now for full access.
COMMENTS