प्रश्न :- एक आघाडीचा नायक असल्याचे श्रेय तुम्ही कशाला द्याल? उत्तर :- मला असं वाटतं की मला आघाडीचा नायक होण्यात प्रसार माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे, त्यात इलेक्ट्रॉनिक आणि इतर माध्यमांचा समावेश आहे. आजतायागत मी कधीही प्रसार माध्यमांशी अरेरावीने वागलो नाही, माझे त्यांच्या बरोबरचे संबंध नेहमीच खेळीमेळीचे राहिले आहेत. प्रश्न :- हिंदी चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? उत्तर :- मला वाटतं त्यात आपण बऱ्याच सुधारणा करू शकतो. मुख्य म्हणजे कथानक लिहिण्यामागे एक निश्चित शास्त्र आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे आपापल्यातले द्वेष, मत्सर, एकमेकांचे पाय ओढण्याची जी एक मानसिकता आहे ती थांबली, तर मला शंभर टक्के खात्री आहे की आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट निर्माण करू. प्रश्न :- एक अभिनेता म्हणून तुम्ही निःस्वार्थीपणे काम करू शकता का? उत्तर…
Register now for full access.
COMMENTS