विद्या बालन कलाकार म्हणून मी स्वार्थी आणि अधाशी आहे – विद्या बालन विद्या बालन एक प्रथितयश आणि हरहुन्नरी कलाकार. ज्योती व्यंकटेश यांच्या बरोबर गप्पागोष्टी करताना आपल्या आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांबद्दल म्हणाल्या, ‘एकाअर्थी माझ्या सतत झगडण्याच्या आणि प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या वृत्तीमुळेच मी कठीण आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारते, उदा. इश्किया, द डर्टी पिक्चर, कहानी, बेगम जान आणि तुम्हारी सुलू. प्रश्न:- बेगम जान चित्रपटात शिव्यांचा भरपूर वापर केला गेला, त्या शिव्या उच्चारताना तुला कितपत कठीण गेलं? उत्तर :- काही ठराविक भावना व्यक्त करण्यासाठी शिव्यांचा सर्रास वापर केला जातो, मात्र सर्वानाच तो उघडपणे करता येत नाही त्यामुळे काहीजण मनातल्या मनात शिव्या देतात ज्या कुणाला ऐकू येत नाहीत. अशावेळी उघडपणे शिव्या देणारी भूमिका साकारायची संधी मिळाल्यावर मी त्याकडे एक आव्हान म्हणून बघितले. मुळात माझी वृत्ती ही झगडण्याची…
Register now for full access.
COMMENTS