BUY NOW

इजिप्त मधला स्त्री सिनेमा

image_mid_11

इजिप्त मधील सिनेसृष्टीचा उदय सुमारे १९२० सालात झाला असे गणले जाते आणि योगायोगाने त्याच वेळी स्त्रीमुक्ती किंवा स्त्रीवादी चळवळही सुरु झाली. त्यात प्रामुख्याने मध्यमवर्गीय स्त्रिया आणि पुरुषांचा पुढाकार होता. बघता बघता ही चळवळ फोफावली आणि सर्वदूर पसरली. ह्या मोठ्या चळवळीचे उद्देश्य होते स्त्रियांना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने जागा मिळवून देणे. अझिझा अमीर, इजिप्तस्थित स्त्री दिग्दर्शक आणि निर्माती सर्वप्रथम पडद्यावर आली ती इजिप्तच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून, १९२७ साली. याचित्रपटाचे नाव होते Leila.

स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाने आणि सबलीकरणाने मात करू शकतात.

काळानुसार मात्र स्त्रियांची खालावलेली प्रतिमा पडद्यावर बघायला मिळते. एकीकडे अगदी आक्रमक प्रतिमा उदा. व्यक्त होणारी, आपल्या हक्कांची जाणीव असणारी आणि त्यासाठी लढणारी, बिनधास्त, धाडशी आणि म्हणूनच पुरुषांच्या दृष्टीने अवास्तव महत्वाकांक्षी तर दुसरीकडे अतिशय गरीब आणि साधी, अननुभवी, बावळट, मानसिक आणि शारीरिक छळाला बळी पडणारी, हक्कांची जाणीव नसणारी आणि असलीच तर त्याचा पाठपुरावा न करणारी, स्वतःचा विचार न करता सतत कुटुंबाचा व इतरांचा विचार करणारी आणि घरातील अथवा नात्यातील पुरुषांचा स्वतःवरचा हक्क मूकपणे मान्य करणारी प्रतिमा दिसते. मग तो अधिकार गाजवणारा पुरुष कधी भाऊ, तर कधी नवरा, कधी वडील, तर कधी तिच्यापेक्षा वयाने व अनुभवाने लहान असणारा काकाही असू शकतो!

स्त्रियांकडे बघायचा संकुचित दृष्टिकोन आणि पराकोटीचे पूर्वग्रह ह्यामुळे इजिप्शिअन स्त्रियांचे समाजातील स्थान अथवा भूमिका या बद्दल समाजात संभ्रम होता. मतांमध्ये झालेल्या ध्रुवीकरणामुळे एक अस्वस्थ, असंतुलित अवस्था समाजात निर्माण झाली होती. या परिस्थितीत स्त्रियांचे अस्तित्व धोक्यात आले. स्त्रियांकडे एक सुशिक्षित, सुसंस्कृत, प्रगतिशील समाजाचा घटक म्हणून बघणे तर सोडाच, पण केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणूनच बघितले जात असे. समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे समजण्यासाठी आपल्याला भूतकाळात डोकवावे लागेल. वेगवेगळ्या कालखंडातील तीन चित्रपट मी वानगीदाखल निवडलेले आहेत.

image_big_10

The Wife of an Important Man (1987)

इजिप्त मधील राजकीय परिस्थितीचे नाट्यमय चित्रीकरण ह्यात दिग्दर्शक अहमद झाकी ह्यांनी केले आहे. ह्या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याचा उत्कर्ष आणि अधोगतीची कथा साकारली आहे.

वरून एक सरळ साध्या दिसणाऱ्या माणसाशी मोनाचे लग्न होते. परंतु, लग्न झाल्यावर तो एक संधीसाधू आणि हलकट माणूस आहे ह्याची जाणीव तिला होते.

मोना गप्प बसते. शेजाऱ्याबरोबर पत्ते खेळणे, सिगारेट ओढणे आणि जुगार खेळणे ह्यातच ती समाधान मानते. खंबीरपणे अन्यायाच्या विरुद्ध लढा देणे व स्वाभिमानाने जगणे तिच्या गावीही नसते. स्वतःच्या आवडीनिवडीही ती पूर्ण करू शकत नाही.

परंतु, सर्वस्व गमावल्यावर मोना आपल्या कुटुंबाला विश्वासात घेते आणि आपल्या वडिलांच्या घरी निघून येते. तिथेही तिचा नराधम नवरा तिच्या डोळ्यादेखत तिच्या वडिलांची हत्या करतो आणि लगेच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करतो. मोना एकाकी पडते आणि सतत भीतीखाली जगत असते.

घरात होणाऱ्या छळा विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्व आवाज तिला उठवता येत नाही. ज्या वातावरणात ती वाढलेली असते त्यात तिला हे शिकवलेच जात नाही. तिच्या माहेरच्यांनाही अन्यायाशी लढा कसा द्यावा ह्याची जाणीव नसते पण कालांतराने त्यांना ते समजते आणि ते मोनाला पाठिंबा देतात, तिच्या मागे उभे रहातात. आजूबाजूच्या समाजातील सत्य परिस्थिती काही वेगळीच असते. मागासलेल्या शहर -उपनगरात आणि खेडेगावांमध्ये स्त्रियांची कुटुंबेच त्यांना परत छळवणूक करणाऱ्या नवऱ्याकडे जाण्यासाठी तिचे मन वळवत असत. त्यात भरीस भर म्हणजे प्रस्थापित कायदे सुद्धा महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या छळा विरुद्ध कुठल्याही संरक्षणाची हमी देत नसत. अशा छळवणूक करणाऱ्या माणसांना गुन्हेगार ठरवेपर्यंत बऱ्याच वेळा फारच उशीर झालेला असे. हा चित्रपट त्यावेळची परिस्थिती आणि पुढे होऊ घातलेले बदल ह्यातील मध्यबिंदूच होता असे वाटते.

I want a solution (1975)

हा चित्रपट अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या नवऱ्याबरोबर रहाणाऱ्या स्त्रियांच्या घटस्फोटाच्या मागणीचा हिरिरीने पुरस्कार करतो. लग्न आणि घटस्फोटांच्या कायद्यातील त्रुटी हा चित्रपट समाजापुढे आणतो आणि त्यात बदल सुचवण्याचा प्रयत्न करतो.
कौटुंबिक आणि विवाहविषयक कायद्यामध्ये केलेले बदल हे ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मूळ कारण होते. आजही हा चित्रपट अशा प्रकारच्या चित्रपटांना मार्गदर्शक ठरतो..

मोना गप्प बसते. शेजाऱ्याबरोबर पत्ते खेळणे, सिगारेट ओढणे आणि जुगार खेळणे ह्यातच ती समाधान मानते. खंबीरपणे अन्यायाच्या विरुद्ध लढा देणे व स्वाभिमानाने जगणे तिच्या गावीही नसते. स्वतःच्या आवडीनिवडीही ती पूर्ण करू शकत नाही.

परंतु सर्वस्व गमावल्यावर मोना आपल्या कुटुंबाला विश्वासात घेते आणि आपल्या वडिलांच्या घरी निघून येते. तिथेही तिचा नराधम नवरा तिच्या डोळ्यादेखत तिच्या वडिलांची हत्या करतो आणि लगेच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करतो. मोना एकाकी पडते आणि सतत भीतीखाली जगत असते. इजिप्त मधील लग्न आणि घटस्फोटांच्या कायद्यांवर ह्या चित्रपटाद्वारे मार्मिक टीका-टिप्पणी केली आहे. दुर्रीयाचे लग्न एका छळवणूक करणाऱ्या हलकट आणि कपटी व राजनैतिक माणसाबरोबर होते. फार छळ सहन करते.

शेवटी तिची सहनशक्ती संपते आणि ती घटस्फोटाचा दावा दाखल करते. हा चित्रपट समाजातील अतिशय क्रूर अशा सत्यपरिस्थितीचा पर्दाफाश करतो. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्त्रियांकडे बघणाऱ्या समाजाच्या दृष्टिकोनावरही प्रकाश टाकतो. जो समाज स्त्रियांना छळवणूक करणाऱ्यांविरुद्ध कायदे करू शकत नाही, तोच समाज स्त्रियांच्या स्वातंत्र्य मिळविण्याचा धीट प्रयत्नही पचवू शकत नाही. वरील दोन्ही ७० आणि ८० च्या दशकातले हे चित्रपट महिलांचे समाजातील अत्यंत रसातळाला गेलेले स्थान, हरवलेला स्वाभिमान, त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ह्याबद्दल असलेल्या समाजाची उदासिनता ह्यावर भाष्य करतात.

image_big

हे चित्रपट इजिप्तमधील १९७० व १९८० दशकांमधील ‘समाज आणि चित्रपट’ याची कल्पना आपल्याला देतात. ह्या चित्रपटांनी स्त्रियांना न्याय मिळवून दिला का? याचे उत्तर त्यांना मिळणाऱ्या सन्मान्य वागणुकीवर आणि त्यांच्या परिस्थितीवर केलेल्या अतिशयोक्तीरहित सार्थ चित्रणावरच ठरेल. वरील दोन चित्रपट आणि असे इतर अनेक चित्रपट महिलांच्या अशा भूमिकांमुळे दिशाहीन झालेले दिसतात आणि यामुळे महिलांना फायदा होण्यापेक्षा त्यांना सतत अपमान, छळवणूक आणि लैंगिक अत्याचारालाच सामोरे जावे लागले. ह्याचे उदाहरण द्यायचे झाले, तर ‘678’ नावाच्या २०१० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाकडे बघावे लागेल. या चित्रपटाची नायिका दररोज ६७८ नंबरच्या बसने प्रवास करत असते. बऱ्याच वेळातिला लैंगिक छळाला तोंड द्यावे लागते. शेवटी तिचा संयम सुटतो आणि ती अन्याया विरुद्ध पेटून उठते. त्यावेळच्या कुटुंबांमध्ये मुलींना कौटुंबिक प्रतिष्ठा आणि नांव हे दोन्ही सांभाळणे ही त्यांची जबाबदारी आहे असे सांगतच वाढवले जात असे, मुलामुलींचे एकत्र वावरणे मुलीच्या बाबतीत खपवून घेतले जात नसे, मात्र त्याच घरातील मुलं मात्र आपल्या इतर मुलींबरोबरच्या संबंधांबाबत फुशारक्या मारत. हा विरोधाभास फारच घातक होता.

COMMENTS