BUY NOW

शैलेंद्र: एक मनस्वी शब्दप्रभू

-मृणाल काशीकर खडक्कर

सहज शब्दांचा जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीतकार शैलेंद्र यांची गीतं असलेल्या चित्रपटांना जवळजवळ पाच दशकं होऊन गेली आहेत. तरीही, अजूनही त्यांच्या शब्दांचं गारुड रसिकांच्या मनावर कायम आहे. १९५०-६० च्या दशकातील संगीतकारांना जितकं त्या गाण्यांना दिलेल्या कर्णमधुर सुरावटींचं श्रेय जातं, तितकच ते शब्द ज्यांच्या लेखणीतून उतरले त्या शैलेंद्रजींनादेखील जातं!

शैलेंद्र यांचं मूळ नाव शंकरदास केसरीलाल शैलेंद्र. ३० ऑगस्ट १९२३ साली रावळपिंडी येथे जन्मलेल्या शैलेंद्र यांनी सुस्थिती आणि गरीबी दोन्हीचा अनुभव खूप लहानपणीच घेतला. त्यांच्या रावळपिंडी (स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाब) ते मुंबई या जीवनप्रवासादरम्यान धोजपूर (बिहार), मथुरा (उत्तर प्रदेश) इथे राहणं झालं. लहानपणापासून त्यांच्या संवेदनशील मनाने हे भौगोलिक, सांस्कृतिक बदल बारकाईने टिपले. लहानपणापासून समाजात आणि कुटुंबात घडणारी स्थित्यंतरं अगदी जवळून पाहिली आणि हेच सर्व त्यांच्या कवितांमधून सहजपणे प्रकटत राहिलं.

१९४२ साली माटुंग्याच्या रेल्वे वर्कशॉपपासून एक असामान्य गीतकार हा प्रवास आपणा सर्वांना माहीतच आहे. इप्टाच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सिनेजगतातील श्रेष्ठ कलाकार पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांना अशा हिऱ्यांची अचूक पारख होती. आजवर त्यांनी अनेक हिरे शोधून भारतीय सिनेसृष्टीला समृद्ध केलं आहे आणि शैलेंद्रजी त्यापैकीच एक!

शैलेंद्रजींनी राज कपूर यांना त्यावेळी जरी त्यांच्या ‘आग’ सिनेमासाठी गाणी लिहिण्यास नकार दिला तरी पुढे मात्र परिस्थितीने ही विलक्षण जोडी जुळवून आणली. नंतर शैलेंद्रजी स्वतः राज कपूर यांच्याकडे गेले आणि राज कपूर यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना आर्थिक मदत तर केलीच, पण ते आपल्या येऊ घातलेल्या ‘बरसात’ सिनेमाची शिल्लक असलेली दोन गाणी लिहितील का अशी विचारणाही केली. त्या दिवशी कोणाला कल्पनाही नसेल की ती एका गीतकाराच्या आणि हिंदी सिनेसृष्टीच्या सुवर्ण शब्दप्रवासाची सुरुवात होती!

‘बरसात’ साठी लिहिलेली ती दोन गाणी सुपरहिट तर ठरलीच, पण त्यांनी सिनेसृष्टीला एक अष्टपैलू गीतकार दिला! ‘बरसात में हमसे मिले तुम, तुमसे मिले हम,’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ या त्यांच्या पहिल्याच दोन गाण्यांनी राज कपूरजीना आश्वस्त केलं, की त्यांनी पारख केलेला हिरा साधासुधा हिरा नसून कोहिनूर आहे! राज कपूर, मुकेशजी, शंकर जयकिशन, हसरत जयपुरी या चौकडीमध्ये आता शैलेंद्रजी यांची भर पडली आणि एकाहून एक सरस चित्रपटांची भेट आपल्याला मिळाली.

राज कपूर यांच्यावर चित्रित झालेलं ‘बरसात में हमसे मिले तुम, तुमसे मिले हम,’ हे गाणं त्या सिनेमाचं शीर्षक गीत ठरलं! आणि हिंदी चित्रपटसृष्टीला ‘शीर्षक गीत’ ही संकल्पना आणि उत्तमोत्तम शीर्षक गीतं लिहील असा गीतकारही सापडला. त्यावेळी चित्रपटाला शीर्षक गीत ही संकल्पना त्यांनीच अस्तित्वात आणली असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘बरसात’ पासून सुरु झालेला हा सिलसिला पुढे ‘आवारा’, ‘अनाडी’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘जंगली’, ‘संगम’, ‘छोटी बहन’, ‘राजकुमार’, ‘आयी मिलन की बेला’, ‘हरियाली और रास्ता’, ‘दिल अपना और प्रीत परायी’ अशा अनेक चित्रपटांमधून सुरूच राहिला!

शैलेंद्रजींचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय कमी आणि समर्पक शब्दांत अचूक भावना प्रकट करायचे. त्यांनी लिहिलेली चित्रपट गीतं खूप सहज शब्दांनी सजलेली असायची. त्यांची गाणी समाजातील कोणत्याही थरातील व्यक्तीला समजतील अशी असत. पण, त्यातून अतिशय मोठा गर्भितार्थ पोहोचायचा. ‘अनाडी’ चित्रपटाचं अतिशय गाजलेलं गाणं जे त्या चित्रपटाचं शीर्षकगीतही आहे, ‘सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनियावालों कि हम हैं अनाडी’ या मुखड्याच्या दोन ओळीतच संपूर्ण चित्रपटाचा विषय अत्यंत सहजपणे आपल्यासमोर उलगडणे ही सोपी गोष्ट नाही. तीच गोष्ट ‘आवारा’ चित्रपटाबाबत! ‘आवारा हूँ, या गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ’ या एका ओळीतून चित्रपटाच्या नायकाबद्दल ते सर्वकाही सांगून जातात आणि हे त्यांना चित्रपटाची कथा ऐकल्यावर सहज सुचलं होतं! हीच सहजता त्यांनी सर्व प्रकारच्या गीतांमधून आपल्याला दिली. राजकपूर यांचे आवडते संगीतकार असलेल्या शंकर जयकिशन यांच्याबरोबर आता शैलेंद्र यांचीही जोडी जमली. श्री ४२० मधील त्यांच्या ‘मेरा जूता है जापानी’ गाण्याने तर जगभर लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले.

राजकपूर यांच्या रशियातील लोकप्रियते बरोबरीनेच शैलेंद्र यांच्या त्या सहज शब्दांनादेखील तितकीच लोकप्रियता मिळाली. आजही हे गाणं अनेक देशांत अनेक पिढ्या गात आलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर विदेशी चित्रपटातही ते गुणगुणलं गेलं आहे!

Shailendra-family

‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’, ‘दिल का हाल सुने दिलवाला’, ‘सजन रे झूठ मत बोलो,’ या सारख्या गीतांमधून त्यांच्यातल्या सच्च्या भोळ्या माणसाची झलक दिसते. प्रत्यक्ष जीवनातही अतिशय कठीण परिस्थितीतून कष्टाने वर आलेल्या शैलेंद्रजीना साधी राहणी, सत्य या गोष्टींची आवड होती. त्यांना ‘बरसात’ पासून गवसलेला गीत लेखनाचा सूर त्यांनी जपला, पोसला आणि अतिशय समृद्ध रुपात आपल्याला पेश केला आहे. मूळ वामपंथी असलेल्या शैलेंद्रजींनी जितक्या ताकदीने समाजातील विषमता, गरिबी आपल्यासमोर आणली (आठवा बरं त्यांची गाणी- उजाला चित्रपटातलं ‘सूरज जरा पास आ, आज सपनों की रोटी पकायेंगे हम,’ सारखं गाणं किंवा काला बाजार मधील ‘तेरी धूम हर कहीं, तुझसा यार कोई नहीं’ हे रुपयाची विविध रूपं वर्णणारं गाणं…) तितक्याच ताकदीने अत्यंत हळुवार प्रेम पडद्यावर फुलवण्यासाठी शेकडो गाणी लिहिली. ‘दिल तडप तडप के कह रहा है’, ‘यह मेरा दीवानापन है’ घडी घडी मेरा दिल धडके’, ‘खोया खोया चांद’ सारखी असंख्य गाणी त्याकाळातल्या सर्व प्रेमी युगुलांच्या ओठांवर रुळत ठेवण्याची जादू त्यांना साधली होती.

‘दोस्त दोस्त ना रहा’ (संगम), ‘ओ रे माझी, मेरे साजन है उसपार, नैनन मार’ (बंदिनी), ‘वहां कौन है तेरा’ (गाईड), ‘जीना यहाँ, मरना यहाँ’ (मेरा नाम जोकर) यासारख्या प्रासंगिक चित्रपट गीतांशीही प्रेक्षक सहज जोडले गेले; कारण त्या शब्दांमध्ये सर्वांच्या वाट्याला कधीनाकधी आलेला जीवनानुभव उतरला होता. प्रेम, प्रणय, करुणा, विरह, लहान मुलांची गम्मत-जम्मत, भाऊ बहिणीतील माया, दर्द, कोणतीही भावना ते अतिशय सहज शब्दांत गीतबद्ध करत. ‘तितली उडी,’ ‘याहू.. चाहे कोई मुझे जंगली कहे’ सारखी मस्ती असो, किंवा ‘ये रात भीगी भीगी,’ ‘प्यार हुआ इकरार हुआ’ सारखी गाणी किंवा ‘नानी तेरी मोरनी को मोर ले गये,’ ‘नन्हे मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’, ‘सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी’ या सारखी गाणी असोत… जीवनाचं मोठं सार इतक्या सहजपणे उलगडून दाखवणारा गीतकार हा एकच! त्यांच्यावर रावळपिंडी, धोजपूर (बिहार), मथुरा (उ.प्र.) अशा विविध ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक जडणघडणीचा पगडा त्यांच्या अनेक लोकगीतांवर आधारित चित्रपट गीतांमध्ये दिसून येतो (आठवा बरं, ‘चलत मुसाफिर मोह लियो रे पिंजरे वाली मुनिया’, ‘रमया वस्तावैया’, ‘चढ गयो पापी बिछुआ’… ) ‘तू प्यार का सागर है,’ किंवा ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ सारखी गाणी कोणतेही पुरस्कार मिळाले नाहीत तरी प्रचंड लोकप्रियतेने गौरवली गेली. आजही ही गाणी लहानथोरांच्या ओठांवर असतात. त्यांच्या समकालीन गीतकारांप्रमाणे त्यांच्यावर उर्दूचा पगडा नव्हता. त्यांची गाणी हिंदुस्थानी हिंदी भाषेत असत. पण, ते उर्दू शब्दही लीलया वापरत. त्यांनी जसं चित्रपटाला शीर्षकगीत लिहिण्याची सुरुवात केली, त्याचप्रमाणे ‘एक सवाल मै करू, एक सवाल तुम करो’ सारख्या गाण्याने चित्रपटगीतात सवाल जवाब हा ट्रेंड देखील आणला. ‘जिंदगानी’ सारखा गोड शद्ब त्यांचीच संपत्ती. त्यांच्या अनेक समकालीन गीतकारांनीही त्यांच्या या सहजपणे गहिरे अर्थ उलगडणाऱ्या त्यांच्या शब्दांचं कौतुक केलं, त्याचप्रमाणे पुढील पिढीतील अनेक गीतकार जसे की योगेश, आनंद बक्षी, गुलजार, जावेद अख्तर, इ. ही त्यांच्या शब्दसंपदेला मानतात.

इतक्या महान गीतकाराचं कौटुंबिक आयुष्य मात्र अगदी साधारण होतं. घरी आपल्यावर आपल्या पाच मुलांच्या आणि पत्नीच्या समवेत रमून जाणे, त्यांच्याशी खेळणे, फिरायला नेणे हे एका अतिशय प्रेमळ कौटुंबिक कर्त्याची भूमिका ते जगले. त्यांचा मोठा मुलगा म्हणजे शैली शैलेंद्रदेखील उत्तम गीतकार आहे. त्यांनीही काही अतिशय सुंदर चित्रपटगीतं लिहिली. त्यांच्या कन्या अमला यांच्याजवळील वडिलांच्या आठवणींचा खजाना अनमोल आहे. त्यांचे पुत्र दिनेश शंकर यांनी आजही स्व. शैलेंद्र यांच्या आठवणी जपल्या आहेत.

अवघ्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत जवळजवळ ९०० एकाहून एक सुरेख चित्रपटगीतं दिलेल्या शैलेंद्रजींचा त्यांनी निर्माण केलेला पहिला आणि अखेरचा चित्रपट म्हणजे ‘तीसरी कसम’. अतिशय सुंदर कथानक, एकाहून एक सुंदर गाणी (सजन रे झूठ मत बोलो, पान खाये सैय्या हमारो, दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समायी’ सारखी गाणी) आणि राज कपूर –वहिदा ही जोडी! चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालला नाही तरी हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर मात्र खूप वाखाणला गेला; त्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलं गेलं. १९५८ (ये मेरा दीवानापन है –यहुदी), १९५९ (सब कुछ सीखा हमने ना सिखी होशियारी- अनाडी) आणि १९६८ (मैं गाउं तुम सो जाओ- ब्रह्मचारी) या तीन गीतांसाठी त्यांना सर्वोत्तम गीतकार म्हणून फिल्मफेअर सन्मानाने गौरवलं गेलं. राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटासाठी लिहिलेला ‘जीना यहाँ मरना यहाँ’ गाण्याचा अंतरा त्यांचा अखेरचा ठरला. त्यांच्याच गीतकार असलेल्या शैली शैलेंद्र या सुपुत्राने त्या गाण्याचा मुखडा लिहून ते पूर्ण केलं. १९६६ मध्ये १४ डिसेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. १४ डिसेंबर म्हणजे राज कपूर यांचा वाढदिवस. हा त्यांच्या नात्याचा शेवट होण्याचा एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल.

शंकर जयकिशन, सलील चौधरी, सचिन देव बर्मन, पंडित रवी शंकर, अनिल विश्वास, रवी, रोषण, एस एन त्रिपाठी, राहुल देव बर्मन यांसारख्या अलौकिक संगीतकारांनी त्यांचे शब्द आपल्या संगीताने सजवून अमर केले. बरसात, अनाडी, श्री ४२०, आवारा, दो बीघा जमीन, राजकुमार, मधुमती, तीसरी कसम, यहुदी, सीमा, चोरी चोरी, गाईड, पारख, दिल एक मंदिर, संगम, काला बाजार, दिल अपना और प्रीत परायी, मेरी सूरत तेरी आँखे, अनुराधा, बंदिनी सारखे अजूनही अनेक चित्रपट त्यांच्या गीतांनी सजून अजरामर झाले. तरीही, सचिन देव बर्मन, सलील चौधरी, शंकर जयकिशन या तीन संगीतकारांच्या बरोबर त्यांचं काही दैवी नातं असावं असं वाटतं. एक अतिशय सच्चा माणूस, एक अतिशय प्रेमळ पती आणि पिता, एक शब्दांशी प्रामाणिक असलेला गीतकार आणि सच्चा रसिक अशी प्रतिमा असलेले शैलेंद्रजी त्यांच्या अजरामर शब्दांच्या माध्यमातून आपल्यात आहेत.

रिश्ता दिल से दिल के ऐतबार का,
जिंदा है हम ही से नाम प्यार का,
के मरके भी किसी को याद आयेंगे
किसी के आँसुओं में मुस्कुरायेंगे
कहेंगे फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है!

‘बरसात’ साठी लिहिलेली ती दोन गाणी सुपरहिट तर ठरलीच, पण त्यांनी सिनेसृष्टीला एक अष्टपैलू गीतकार दिला! ‘बरसात में हमसे मिले तुम, तुमसे मिले हम,’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ या त्यांच्या पहिल्याच दोन गाण्यांनी राज कपूरजीना आश्वस्त केलं, की त्यांनी पारख केलेला हिरा साधासुधा हिरा नसून कोहिनूर आहे! राज कपूर, मुकेशजी, शंकर जयकिशन, हसरत जयपुरी या चौकडीमध्ये आता शैलेंद्रजी यांची भर पडली आणि एकाहून एक सरस चित्रपटांची भेट आपल्याला मिळाली.

राज कपूर यांच्यावर चित्रित झालेलं ‘बरसात में हमसे मिले तुम, तुमसे मिले हम,’ हे गाणं त्या सिनेमाचं शीर्षक गीत ठरलं! आणि हिंदी चित्रपटसृष्टीला ‘शीर्षक गीत’ ही संकल्पना आणि उत्तमोत्तम शीर्षक गीतं लिहील असा गीतकारही सापडला. त्यावेळी चित्रपटाला शीर्षक गीत ही संकल्पना त्यांनीच अस्तित्वात आणली असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘बरसात’ पासून सुरु झालेला हा सिलसिला पुढे ‘आवारा’, ‘अनाडी’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘जंगली’, ‘संगम’, ‘छोटी बहन’, ‘राजकुमार’, ‘आयी मिलन की बेला’, ‘हरियाली और रास्ता’, ‘दिल अपना और प्रीत परायी’ अशा अनेक चित्रपटांमधून सुरूच राहिला!

अवघ्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत जवळजवळ ९०० एकाहून एक सुरेख चित्रपटगीतं दिलेल्या शैलेंद्रजींचा त्यांनी निर्माण केलेला पहिला आणि अखेरचा चित्रपट म्हणजे ‘तीसरी कसम’. अतिशय सुंदर कथानक, एकाहून एक सुंदर गाणी (सजन रे झूठ मत बोलो, पान खाये सैय्या हमारो, दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समायी’ सारखी गाणी) आणि राज कपूर –वहिदा ही जोडी! चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालला नाही तरी हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर मात्र खूप वाखाणला गेला; त्याला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलं गेलं. १९५८ (ये मेरा दीवानापन है –यहुदी), १९५९ (सब कुछ सीखा हमने ना सिखी होशियारी- अनाडी) आणि १९६८ (मैं गाउं तुम सो जाओ- ब्रह्मचारी) या तीन गीतांसाठी त्यांना सर्वोत्तम गीतकार म्हणून फिल्मफेअर सन्मानाने गौरवलं गेलं. राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटासाठी लिहिलेला ‘जीना यहाँ मरना यहाँ’ गाण्याचा अंतरा त्यांचा अखेरचा ठरला. त्यांच्याच गीतकार असलेल्या शैली शैलेंद्र या सुपुत्राने त्या गाण्याचा मुखडा लिहून ते पूर्ण केलं. १९६६ मध्ये १४ डिसेंबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. १४ डिसेंबर म्हणजे राज कपूर यांचा वाढदिवस. हा त्यांच्या नात्याचा शेवट होण्याचा एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल.

शंकर जयकिशन, सलील चौधरी, सचिन देव बर्मन, पंडित रवी शंकर, अनिल विश्वास, रवी, रोषण, एस एन त्रिपाठी, राहुल देव बर्मन यांसारख्या अलौकिक संगीतकारांनी त्यांचे शब्द आपल्या संगीताने सजवून अमर केले. बरसात, अनाडी, श्री ४२०, आवारा, दो बीघा जमीन, राजकुमार, मधुमती, तीसरी कसम, यहुदी, सीमा, चोरी चोरी, गाईड, पारख, दिल एक मंदिर, संगम, काला बाजार, दिल अपना और प्रीत परायी, मेरी सूरत तेरी आँखे, अनुराधा, बंदिनी सारखे अजूनही अनेक चित्रपट त्यांच्या गीतांनी सजून अजरामर झाले. तरीही, सचिन देव बर्मन, सलील चौधरी, शंकर जयकिशन या तीन संगीतकारांच्या बरोबर त्यांचं काही दैवी नातं असावं असं वाटतं. एक अतिशय सच्चा माणूस, एक अतिशय प्रेमळ पती आणि पिता, एक शब्दांशी प्रामाणिक असलेला गीतकार आणि सच्चा रसिक अशी प्रतिमा असलेले शैलेंद्रजी त्यांच्या अजरामर शब्दांच्या माध्यमातून आपल्यात आहेत.

रिश्ता दिल से दिल के ऐतबार का,
जिंदा है हम ही से नाम प्यार का,
के मरके भी किसी को याद आयेंगे
किसी के आँसुओं में मुस्कुरायेंगे
कहेंगे फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है!

अमला शैलेंद्र या गीतकार शैलेंद्र यांच्या कन्येशी यावर्षी चित्रवेध ने संवाद साधला, आणि तोही आजच्या काळातले गीतकार व कवी शैली यांनी. या दिवाळीत पहा त्यांच्या आठवणींची ठेव एका सुंदर व्हिडिओ गप्पांमध्ये.

COMMENTS