BUY NOW

संपादकीय

sucheta

२०२० उजाडलंच चीन मधल्या विषाणूची बातमी घेऊन. तोपर्यंत फक्त चीन पुरता सीमित असलेला कोरोना विषाणू कधी जगभरात पोचला हे अक्षरशः कळलंच नाही. मग सुरू झाला लॉक डाऊन. या जबरदस्तीच्या एकांतवासात लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त साथ दिली ती ऑनलाइन असणाऱ्या फिल्म्स, वेब सीरिजनी, संगीताने व पुस्तकांनी. पण किती विरोधाभास आहे ना, हीच इंडस्ट्री आज जगभर बंद आहे. सगळे हतबल आहेत. पण त्यातूनही मार्ग शोधून प्रयोगशील कलाकार काही ना काही करत आहेत. बरोबरच आहे, निसर्गातल्या सर्जनासारखीच ही सर्जनशीलता थांबणार थोडीच आहे.

चित्रवेधनेही आपल्यासाठी यावर्षी नेहमीप्राणेच खास काही आणले आहे. यात आहे कव्हर गर्ल सोनाली व तिचे लॉक डाऊन मधील अनुभव, कोविड survivor मराठी कलाकार व त्यांचे अनुभव. त्याचबरोबर UCC सारख्या मुद्द्यावर शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या उर्वाझी इराणी व कायदेतज्ञ यांची चर्चा आहे. या अंकात आहेत गप्पा, गीतकार व कवी शैलेंद्र यांच्या कन्येशी, या गप्पांमध्ये सामील आहेत आजचे आघाडीचे गीतकार शैली.

याबरोबरच आहे एक प्रचंड नाट्यलेखनाचा साठा. लॉकडाऊनच्या काळात ज्येष्ठ रंगकर्मी योगेश सोमण यांच्या कार्यशाळेत निर्माण झालेल्या कलाकृती. यात आहेत स्वगते, नाट्यछटा आणि एकांकिका. हे सगळे नाट्यप्रकार नाट्यप्रेमींसाठी व नाट्यकलाकारांसाठी एक उत्तम पर्याय ठरतील याची खात्री आहे.

चित्रवेध या वर्षीपासून इंग्रजीमध्येही आपल्या भेटीस येत राहणार आहे, वर्षभर. असेच भरभरून प्रेम राहू द्या. सगळ्या वाचकांना ह्या दिवाळीत उत्तम आरोग्य लाभो व तेवत्या दिव्यांचा लखलखाट कोविड मुळे आलेल्या अंधःकाराला दूर सारो

तुम्हा सगळ्यांना चित्रवेध परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

signature

COMMENTS